आता केदारनाथला द्या ऑनलाईन देणगी

आता केदारनाथला द्या ऑनलाईन देणगी

मुंबई, ता. २७ ः उत्तराखंडमधील विख्यात केदारनाथ मंदिराला देणगी देणे आता सुलभ झाले आहे. या मंदिराला आता रोख देणगी न देता ती ऑनलाईन देता येणार आहे. यासाठी मंदिराच्या बाहेर आता पेटीएमतर्फे क्यूआर कोड लावण्यात आला आहे. तो स्कॅन करून तेथे तात्काळ ऑनलाईन स्वरूपात देणगी देता येईल.

१९७ कम्युनिकेशनची उपकंपनी असलेल्या पेटीएमतर्फे आज (ता. २७) ही माहिती देण्यात आली. पेटीएम यूपीआय, पेटीएम पोस्टपेड किंवा वॉलेटमार्फत ही देणगी देता येईल. त्याचप्रमाणे पेटीएम सुपरॲपचा वापर करून त्यातील डिव्होशन विभागातून भाविक घरबसल्यादेखील केदारनाथ मंदिराला देणगी देऊ शकतील, अशी माहिती पेटीएमच्या प्रवक्त्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com