भाकरी फिरविली पाहिजे म्हणजे अजित पवारांना दूर करणे - नरेश म्हस्के

भाकरी फिरविली पाहिजे म्हणजे अजित पवारांना दूर करणे - नरेश म्हस्के

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजित पवार यांना दूर केले पाहिजे, हे स्पष्ट होत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. यामध्येही अजून काय स्पष्टीकरण हवे असल्‍यास सकाळच्या ‘भोंग्या’ला विचारा, असा टोलाही म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांना यावेळी लगावला.
अजित पवार यांना बाजूला करण्यासाठी सर्व काही खटाटोप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. भाकरी फिरवली पाहिजे, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, हा रोष आणि रोख अजित पवार यांच्याकडे जात असल्याचा दावाही शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. अमोल कोल्हे हे पवार यांच्याशी प्रामाणिक आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे ते खासदार आहेत. पवार यांची जी इच्छा आहे, पवार यांचे जे शब्द आहेत, तेच अमोल कोल्हे बोलणार, असेही ते म्हणाले. सगळीकडे अजित पवार सुरू असताना ते जयंत पाटलांचे नाव घेणार असतील तर शरद पवार यांची इच्छा काय आहे हे तुम्हाला समजले पाहिजे, असेही ते म्हणाले. नाकासमोर सरकार बदलले आहे, आता काय? हे लोक बदला घेणार आहेत, यांच्या जिभेमध्ये फक्त जोर आहे. बदला घेण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, तो त्यांच्यात नाही. दिवसाढवळ्या ५० आमदार निघून जातात, तेरा खासदार निघून जातात, नगरसेवक निघून जातात, मग हे काय बदला घेणार, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com