गुंदवली ते बीकेसी प्रीमियम एसी बससेवा नागरिकांच्या पसंतीस

गुंदवली ते बीकेसी प्रीमियम एसी बससेवा नागरिकांच्या पसंतीस

गुंदवली ते बीकेसी
प्रीमियम एसी बस
मुंबईकरांच्या पसंतीस

मुंबई, ता. २७ : महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने बेस्टच्या समन्वयाने मेट्रो प्रवाशांसाठी प्रीमियम एसी बससेवा सुरू केली आहे. गुंदवली ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान ती चालवली जात असून तिला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दैनंदिन प्रवासी आकडेवारीतून दिसून आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
बीकेसीमध्ये अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. मुंबई आणि उपनगरातून बीकेसीकडे येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्याची दखल घेत एमएमएमआरओसीने बेस्ट परिवहनच्या समन्वयाने ११२ क्रमांकाची बससेवा सुरू केली आहे. सकाळी ७.३० ते ११.४० आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते गुंदवली स्थानक दुपारी ३.४० ते रात्री ८.१५ पर्यंत सेवा सुरू आहे. त्यासाठी प्रवाशांना किमान ६० ते ९० रुपये मोजावे लागत आहेत. सध्या बसच्या दहा फेऱ्या सुरू आहेत. ५ एप्रिलपासून सेवा सुरू झाली असून दररोज सरासरी ५०० ते ६०० प्रवासी त्याच लाभ घेत आहेत. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल तशी प्रवाशांची संख्या वाढेल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com