अवघ्या एका दिवसात उतरवले वज्रमुठ सभेचे फलक

अवघ्या एका दिवसात उतरवले वज्रमुठ सभेचे फलक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : महाविकास आघाडीच्यावतीने १ मे रोजी मुंबईतील बीकेसी संकुलात वज्रमुठ सभा पार पडणार आहे. या सभेस विराट संख्येने नागरिकांनी उपस्थित अशा आशयाचे फलक राष्ट्रवादीच्यावतीने गुरुवारी शहरभर लावण्यात आले होते. परंतु अवघ्या एका दिवसातच या फलकांवर कारवाई करीत पालिकेने फलक उतरवले आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फलकावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करीत शहरात इतर पक्षांचे लावण्यात आलेल्या बॅनर, पोस्टर दिसले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वज्रमुठ सभेचे सर्वाधिक फलक हे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात लावण्यात आले होते. त्यामुळे शिंदे यांच्या मतदार संघात फलकबाजी करून राष्ट्रवादीने शिवसेनेला आव्हान देण्याचे काम केल्याचे दिसून आले होते. मात्र, गुरुवरील लावलेले फलक अवघ्या एका दिवसात काढून टाकण्यात आले. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतप्त झाल्याचे दिसून आले. शहरात इतर पक्षांचे लावण्यात आलेल्या बॅनर, पोस्टर दिसले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सकाळपासून ठाणे महापालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी सगळे बॅनर्स काढत फिरत असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी इतर वेगवेगळ्या पक्षाचे आणि खासकरून सत्ताधारी पक्षाचे बॅनर्स लागलेले आहेत. त्याला साधा हातही लावण्याची हिम्मत त्यांनी केलेली नाही. आम्ही काल रात्री बॅनर्स लावले आणि आज सकाळपासून पालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी हे बॅनर्स उतरवायला सुरुवात केली. त्या अधिकाऱ्यांमध्ये आघाडीचे नाव भालेराव यांचे आहे. मी त्यांना स्वत: फोन केला पण त्या फोनचे देखील त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आव्हाड यांनी त्यांचा मोबाइल क्रमांकाच सोशल मिडियावर जाहीर केला.

........................................

आव्हाडांना खासदार श्रीकांत शिंदेचा धक्का
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून १ मे रोजी ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे ९० फीट रोडवर आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला असतांना आता खासदार शिंदे यांनी थेट कार्यक्रमच कळव्यात आयोजित करुन त्यांना एक प्रकारे धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com