चौदा वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार

चौदा वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार

अंधेरी, ता. २८ (बातमीदार) : चौदा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जोएल मनोज सालम याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अपहरणासह बलात्कार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्‍यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. १४ वर्षांची मुलगी जोगेश्‍वरी परिसरात राहत असून, काही महिन्यांपूर्वीच तिची जोएलशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. त्‍यानंतर संशयिताने तिला ठाण्यातील कोपरी परिसरात आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या दरम्‍यान त्यांच्यात तीन ते चार वेळा शारीरिक संबंध आले होते. ही घटना पीडितेच्या आईला समजताच तिने जोएलविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक सीमा सकुंडे, सचिन जाधवर, एपीआय आनंद नागराळ, विनोद माने, शैलेश शिंदे, अजित चोपडे, नवनाथ गीते, गणेश हंचनाले यांनी जोएल सालम याला ठाण्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी दिडोंशीतील विशेष सत्र न्‍यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्‍यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com