डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक माजी स्थायी समिती सभापती अजित नाडकर्णी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक माजी स्थायी समिती सभापती अजित नाडकर्णी यांचे निधन
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक माजी स्थायी समिती सभापती अजित नाडकर्णी यांचे निधन

डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक माजी स्थायी समिती सभापती अजित नाडकर्णी यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २८ : कल्याण-डोंबिवली पालिकेतील माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ शिवसैनिक अजित नाडकर्णी (वय ६८) यांचे शुक्रवारी सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रसिद्ध तबलापटू ऐश्वर्या, डॉक्टर मुलगा नितीश असा परिवार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील एक निष्ठावान शिवसैनिक अशी अजित नाडकर्णी यांची ओळख होती. मागील ४० वर्षांच्या काळात शिवसेनेच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. १९९५ ते २००० या कालावधीत कल्याण-डोंबिवली पालिकेत त्यांनी नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती पद भूषविले होते. पत्रीपुलाजवळील नवीन जोड पूल उभारणीचा प्रस्ताव आणि ते काम नाडकर्णी यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. बालभवन उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. शहरातील काही विकासकामे मार्गी लावण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शिवसेनाप्रमुखांच्या विश्वासातील डोंबिवलीतील एक ज्येष्ठ, निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. शनिवारी सकाळी ९.३० वाजता डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.