Wed, Sept 27, 2023

अमली पदार्थ विकणाऱ्या दोन आरोपींना अटक
अमली पदार्थ विकणाऱ्या दोन आरोपींना अटक
Published on : 29 April 2023, 12:12 pm
चेंबूर, ता. २९ (बातमीदार) ः अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ३७ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ हस्तगत केला. सोहेल अब्दुल कय्युम शेख (वय ३०) आणि साजिद अब्दुल रशीद शेख (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चित्ता कॅम्प व पायली पाडा परिसरात राहणारे आरोपी गुरुवारी (ता. २७) दुपारी या पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक नीलेश अरुणसिंग परदेशी यांना मिळाली असता त्यांनी आरोपींना ट्रॉम्बे येथील बशीरमुल्ला मैदान पायलीपाडाजवळ जाऊन अमली पदार्थांसह अटक केली.