पनवेलमध्ये वेश्याव्यवसायप्रकरणी दलालाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये वेश्याव्यवसायप्रकरणी दलालाला अटक
पनवेलमध्ये वेश्याव्यवसायप्रकरणी दलालाला अटक

पनवेलमध्ये वेश्याव्यवसायप्रकरणी दलालाला अटक

sakal_logo
By

पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून पनवेलच्या करंजाडे भागातील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दलालाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून अटक केली आहे. त्याने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. नैनेश पवार (२९) असे या दलालाचे नाव असून पोलिसांनी आता नैनेशसोबत असलेल्या महिला दलालाचा शोध सुरू केला आहे. या घरामध्ये मागील एक वर्षापासून वेश्याव्यवसाय चालवण्यात येत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला नैनेश पवार हा दलाल खालापूर येथील चौक भागात राहण्यास असून मागील तीनचार महिन्यांपूर्वी त्याने व महिला दलाल अर्चना या दोघांनी वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी पनवेलच्या करंजाडे सेक्टर-२ मधील सावित्री अनंत अपार्टमेंटमधील एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.