दादर-धुळे विशेष एक्स्प्रेस आजपासून धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादर-धुळे विशेष एक्स्प्रेस आजपासून धावणार
दादर-धुळे विशेष एक्स्प्रेस आजपासून धावणार

दादर-धुळे विशेष एक्स्प्रेस आजपासून धावणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : दादर-धुळे विशेष एक्स्प्रेसला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज (ता. २९) हिरवा झेंडा दाखवून मुंबईच्या दिशेने रवाना केली. दादर-धुळे ही एक्स्प्रेस त्रि-साप्ताहिक असून उद्यापासून (ता. ३०) धावणार आहे. ट्रेन क्र. ०१०६५ एक्स्प्रेस ३० एप्रिलपासून दादर येथून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि धुळ्याला रात्री ११.३५ वाजता पोहोचेल; तर ट्रेन क्र. ०१०६६ धुळे येथून १ मेपासून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.१५ वाजता दादर येथे पोहोचेल. या एक्स्प्रेसची एक वातानुकूलित चेअर कार, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसला शिरूड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. एक्स्प्रेसच्या उद्‍घाटनावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, उन्मेष पाटील, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.