Wed, October 4, 2023

पश्चिम रेल्वेवर १६ उन्हाळी विशेष गाड्या
पश्चिम रेल्वेवर १६ उन्हाळी विशेष गाड्या
Published on : 29 April 2023, 2:06 am
मुंबई, ता. २९ : पश्चिम रेल्वेने वडोदरा ते हरिद्वारदरम्यान विशेष उन्हाळी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेन क्र. ०९१२९/०९१३० वडोदरा-हरिद्वार सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या १६ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन क्र. ०९१२९ वडोदरा-हरिद्वार सुपरफास्ट एक्स्प्रेस वडोदरा येथून दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता सुटेल आणि हरिद्वारला दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ६ मे ते २४ जून २०२३ पर्यंत धावणार आहे. ट्रेन क्र. ०९१३० हरिद्वार-वडोदरा सुपरफास्ट एक्स्प्रेस ७ मे ते २५ जून या कालावधीत दर रविवारी हरिद्वारहून सायंकाळी ८.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता वडोदरा येथे पोहोचेल. या दोन्ही एक्स्प्रेसचे रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर आरक्षण सुरू झाले आहे.