जिजाऊ संस्थेतर्फे गुणगौरव समारंभ उत्साहात

जिजाऊ संस्थेतर्फे गुणगौरव समारंभ उत्साहात

विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) : जिजाऊ एमपीएससी/यूपीएससी ॲकॅडमी व वाचनालय तसेच जिजाऊ पोलिस ॲकॅडमीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. जिजाऊच्या सहकार्याने आणि दिलेल्या पाठबळामुळे या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक व्हावे व पुढील काळातही त्यांच्या संघर्षाची यशोगाथा व्हावी, त्यांचा उत्साह आणखी वाढवावा या हेतूने जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. याप्रसंगी आयपीएस अधिकारी प्रशांत डगले, उद्योजक तुषार राऊळ, पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, गोदरेज कंपनीचे अधिकारी निखिल वाहित्रा, चार्टर्ड अकाऊंटंट अनुप पटेल, हर्षद पाटील, विक्रमगड नगर पंचायतीचे कार्यकारी अधिकारी अजय साबळे, पोलिस उपनिरीक्षक सतीश जगताप, पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे, जिजाऊ संस्थेचे आधारस्तंभ भगवान सांबरे, संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे, धीरज सांबरे, हेमांगी पाटील, मोनिका पानवे, नगराध्यक्ष नीलेश पडवळे, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर सांबरे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com