शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

कल्याण, ता. ३० (बातमीदार) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शाळापूर्व तयारी आयोजित मेळावा शुक्रवारी (ता. २८) उत्साहात पार पडला. महापालिकेच्या परिसरात येणाऱ्या सर्व शाळांमध्ये प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनात शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या ५९ शाळांवर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी विविध स्टॉल लावण्यात आले. वजन-उंची मोजण्यासाठी स्टॉल, यासंदर्भातील चित्रांमध्ये रंग भरण्यासाठी स्टॉल, विविध शैक्षणिक साहित्य संदर्भातील स्टॉल, मनोरंजक खेळ आणि शाळापूर्व तयारीसंदर्भातील पुस्तकवाटपाचा कार्यक्रम सर्व शाळा स्तरावर घेण्यात आला. महापालिकेच्या शाळेत विद्यार्थीसंख्या जवळपास १५०० ते २००० पर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. शाळापूर्व तयारी कार्यक्रम समन्वयक म्हणून विषयतज्ज्ञ राजाभाऊ शेप यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com