खगोलशास्त्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खगोलशास्त्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
खगोलशास्त्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

खगोलशास्त्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

बोर्डी, ता. ३० (बातमीदार) : जागतिक खगोलशास्त्र दिनाच्या निमित्ताने बोर्डी ॲस्ट्रॉनॉमिक क्लबच्या वतीने खगोलशास्त्र अभ्यासक अथर्व पाटील यांनी आयोजित केलेल्या बोर्डी खगोलशास्त्र महोत्सवाला डहाणू तालुक्यातील व गुजरात राज्यातील चारशे विद्यार्थी व पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आयोजकांनी संपूर्ण आकाशच चित्रमय रूपाने भूतलावावर साकार केले होते. प्रेक्षकांनीही या अभूतपूर्व प्रदर्शनाचा आनंद लुटला.
महोत्सवाचे उद्‍घाटन एम. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य टी. एन. घोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मराठी विज्ञान परिषदेच्या बोर्डी शाखेच्या अध्यक्षा ऊर्मिला करमरकर, संदीप ठाकूर, पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे उपस्थित होते. अथर्व पाटील हा एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी असून खगोलशास्त्रातील ज्ञान त्याने ज्ञान अवगत केले आहे. अथर्व पाटीलच्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल असा विश्वास उद्‍घाटनप्रसंगी टी. एन. घोरुडे यांनी व्यक्त केला. खगोलशास्त्रातील संकल्पना समजावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. अजय पाटील व सूर्यहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग सावे, ईशिता पाटील, श्रुती पाटील, मैत्री पाटील, देविका दोडका, पर्णवी राऊत, अनुज राऊत, स्वरा राऊत, प्रज्वल्य राऊत, राजवल्य राऊत व सौम्या पाटील यांनी प्रदर्शन पाहण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रातील संकल्पना समजावून दिल्या.