‘बौद्धिक संपदा अधिकार’ कार्यशाळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बौद्धिक संपदा अधिकार’ कार्यशाळा उत्साहात
‘बौद्धिक संपदा अधिकार’ कार्यशाळा उत्साहात

‘बौद्धिक संपदा अधिकार’ कार्यशाळा उत्साहात

sakal_logo
By

विरार, ता. ३० (बातमीदार) : वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयांतर्गत दर्जा नियंत्रण कक्षातर्फे ‘बौद्धिक संपदा अधिकार आणि स्वामित्व हक्क सुविधा’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता मोहिमेचे प्रतिनिधी आणि पुणे येथील डॉ. सूरज भोयर हे या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ संसाधन व्यक्ती म्हणून लाभले होते. कार्यशाळेत विद्यार्थी आणि प्राध्यापक अशा ८० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. श्रीराम डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपा मुर्डेश्वर-कत्रे यांनी आभार मानले.