कळवण देवीचा आज यात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळवण देवीचा आज यात्रोत्सव
कळवण देवीचा आज यात्रोत्सव

कळवण देवीचा आज यात्रोत्सव

sakal_logo
By

कळवा, ता. ३० (बातमीदार) : कळव्यातील भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या कळवण देवी या ग्रामदेवतेचा यात्रोत्सव उद्या (ता. १) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आजपासूनच (ता. ३०) मंदिर परिसरात विविध खेळण्याची व संसारोपयोगी वस्तूंची दुकाने सजली आहेत.

कळवण देवी ही कळव्यातील जागृत ग्रामदेवता असल्याने नवस फेडण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतात. या यात्रेच्या निमित्ताने येथील काही स्थानिक ठराविक कुटुंब नातेवाईक व मित्रपरिवार यात्रेसाठी आमंत्रण करून त्यांच्यासाठी जेवणाच्या मैफिली आयोजित करतात. या यात्रेत ठाण्यासह कळवा, मुंब्रा, विटावा व खारेगाव परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

मंदिरात सोमवारी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, होमहवन, महाआरती आणि मिरवणूक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या यात्रेचे विशेष म्हणजे यात्रेनिमित्त येथील गावदेवी मैदानात कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेसाठी मुंबई, कल्याण, नवी मुंबई, भिवंडी, कर्जत, पनवेल परिसरातील मल्ल सहभागी होतात. स्पर्धा संपल्यावर कळव्यातील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येते. या यात्रेत विविध खेळण्याची दुकाने, मिठाई व खाऊची दुकाने, आकाश पाळणे, घरगुती वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत.