ढेकाळे गावातून दमण बनावटीचा मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढेकाळे गावातून दमण बनावटीचा मद्यसाठा जप्त
ढेकाळे गावातून दमण बनावटीचा मद्यसाठा जप्त

ढेकाळे गावातून दमण बनावटीचा मद्यसाठा जप्त

sakal_logo
By

मनोर, ता. ३० (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावात छापा टाकून केलेल्या कारवाईत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. दमण बनावटीच्या मद्य साठ्याची विक्रीच्या उद्देशाने शेतातील झोपडीत साठवणूक करून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी दारू साठवून करणारे दोन आणि पुरवठा करणाऱ्या आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावात दमण बनावटीच्या दारूची शेतातील झोपड्यात साठवणूक करून बेकायदा विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सुबोध नारगोळकर यांच्या मालकीच्या शेतामधील झोपडीवर छापा टाकला असता झोपडीत दमण बनावटीच्या दारूचा १८ बॉक्स मधून ५५ हजार ४२० किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
आरोपी सुबोध नारगोळकर आणि शिवा भोवर यांनी दमन बनावटीचा दारूची साठवणुक तसेच विक्रीच्या उद्देशाने शेतामधील झोपडीत बाळगून असल्याचे आढळून आल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूच्या साठयाबाबत विचारणा केली असता धिरज पाटील याच्या कडून खरेदी केल्याची माहिती दिली. घिरज पाटील याने इनोव्हा कार मधून पुरवठा केल्याची कबुली दिली. धिरज पाटील याला फरार घोषित करून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.