बोर्डीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा संग्राम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा संग्राम
बोर्डीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा संग्राम

बोर्डीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा संग्राम

sakal_logo
By

बोर्डी, ता. ३० (बातमीदार) : डहाणू तालुका व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बोर्डी व्यायाम मंदिर कबड्डी संघातर्फे जिल्हास्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा २०२३ चा शुभारंभ बोर्डीतील ज्येष्ठ नागरिक एन. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कबड्डीप्रेमी मिलिंद पाटील, प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश सावे आदी मान्यवर उपस्थित होते. बोर्डी व्यायाम मंदिर कबड्डी संघ १९९५ पासून कबड्डी स्पर्धा आयोजित करीत असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे पंचमंडळ सदस्य विक्रांत म्हात्रे, निखिल राऊत या कामी जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असून पालघर जिल्ह्यातील नालासोपारापासून झाईपर्यंतचे १६ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. विजयी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक व खिलाडी परिवारचे संचालक मिलिंद पाटील यांनी आकर्षक पारितोषिक दिली आहेत.