Tue, October 3, 2023

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Published on : 30 April 2023, 12:17 pm
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
पीडिता ही खारघरमध्ये आई-वडिलांसह राहते. गेल्या आठवड्यात पीडितेचे पोट दुखू लागल्याने तिला तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेव्हा ती २६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. याबाबत पीडितेला विचारले असता नोव्हेंबर २०२२ मध्ये अज्ञात तरुणाने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे.