रायगडमध्ये १८ पोलिसांची पदोन्नती

रायगडमध्ये १८ पोलिसांची पदोन्नती

अलिबाग, ता. ३० (बातमीदार) ः रायगड पोलिस दलातील १८ पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यात आठ हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक व दहा पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार म्हणून बढती मिळाली आहे. निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या अधारे पदोन्नती देण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

रायगड पोलिस दलात रेवदंडा एक, पोलिस मुख्यालय तीन, खोपोली एक, जिल्हा विशेष शाखा एक, कोकण भवन आणि मुंबई महानिरीक्षक येथील प्रत्येकी एक अशा आठ हवालदारांची सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच रसायनी, पोलिस मुख्यालय, खोपोली, मोटार वाहन परिवहन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग- ठाणे, अलिबाग व खालापूर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या दहा पोलिसांना पदोन्नती देण्यात आली आहे.

संदीप पडवळ, उत्तम कांबळे, नारायण पाशिलकर, राजेश मार्कंडे, जितेंद्र म्हात्रे, दीपक गावंड, दिनेश बिर्जे, रवींद्र सोनावणे यांची पोलिस हवालदार पदावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे; तर योगेश म्हात्रे, अमोल धायगुडे, संदीप साळुंखे, गोरखनाथ हाके, मंगल जाधव, शुभांगी खिचडे, हेमंत कोकाटे, विवेक खंडागळे, ओंकार पेढवी, सोनम कांबळे यांची पोलिस नाईक पदावरून पोलिस हवालदार पदावर बढती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com