शाळांना संगणक संचाची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांना संगणक संचाची भेट
शाळांना संगणक संचाची भेट

शाळांना संगणक संचाची भेट

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : जाणीव प्रतिष्ठान व लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा केलठन येथे केलठन, उसगाव, चांबळे, चिरांबे अशा पाच जिल्हा परिषद शाळांना संगणक व कलर प्रिंटर यूपीएस बॅकअप सहित देण्यात आले. मागील महिन्यातही पाच जिल्हा परिषद शाळांना संगणक व कलर प्रिंटर देण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासोबत येणाऱ्या आगामी काळामध्ये जिल्हा परिषद शाळांची सक्षमीकरण कोणकोणत्या उपक्रमातून करता येईल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येतील यावर सखोल चर्चा करण्यात आली. पुढील शैक्षणिक वर्षापासून या जिल्हा परिषद शाळांना संगणक, संगीत व खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षक नेमणे, शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक दौरे करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक क्षेत्रभेटी किंवा शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ला येणारे विद्यार्थी अंगणवाडीतच सक्षम करण्यासाठी योग्य उपक्रम व उपाययोजनांची आखणी करणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.