Mon, Sept 25, 2023

प्रकाश साईल यांचा गौरव
प्रकाश साईल यांचा गौरव
Published on : 1 May 2023, 10:10 am
खर्डी, ता. १(बातमीदार) : ठाणे ग्रामीण पोलिस दलाच्या वासिंद स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार प्रकाश हरी साईल यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदाचे पोलिस महासंचालक पदक देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते त्यांना महासंचालक पदक ठाणे येथे प्रदान करण्यात आले. साईल यांचे गुन्हे प्रकटीकरणातील कौशल्य वाखाणण्याजोगे असून त्यांना तपासाचे ज्ञान व त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांना आतापर्यंत तब्बल २१३ बक्षिसे मिळाली आहेत.