सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्‍घाटन

सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्‍घाटन

बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : झाई बोरीगाव भाजीपाला फळ उत्पादक सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचा उद्‍घाटन सोहळा सहायक निबंधक अजय गुजराती यांच्या हस्ते पार पडला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष विकास म्हात्रे, सचिव अरविंद राऊत, प्रभाकर राऊत, शिवराम राऊत, बोर्डी सहकारी ग्राहक भांडाराचे अध्यक्ष व्रजेश शहा, महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बोर्डी रोड रेल्वेस्थानक परिसरात उड्डाणपूल बांधताना संस्थेची जुनी इमारत रस्तारुंदीकरणामध्ये पाडली गेली. त्यामुळे संस्थेने नवीन इमारत बांधली आहे. भाजीपाला खरेदी-विक्री आणि शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या खते, इतर साहित्याचे विक्री व्यवस्थापन संस्थेकडून करण्यात येते. या कामासाठी या वास्तूचा उपयोग होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विकास म्हात्रे यांनी व्यक्त केला. सहकार चळवळ चालविणाऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. लोकांना सहकार शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून दर महिन्यातून एकदा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. या पुढेही माझे कार्य अविरत चालू राहील, असे गुजराती यांनी प्रतिपादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com