Wed, Sept 27, 2023

बोर्डीत तासभर पावसाने झोडपले
बोर्डीत तासभर पावसाने झोडपले
Published on : 1 May 2023, 1:05 am
बोर्डी, ता. १ (बातमीदार) : बोर्डी परिसरात सोमवारी (ता. १) सकाळी आठच्या सुमारास तासभर अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली; तर आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मागच्या काही दिवसांपासून उष्णता प्रचंड वाढली आहे. वातावरणही सतत ढगाळ असल्यामुळे केव्हाही पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. सोमवारी सकाळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली; मात्र तासाभरातच पावसाने काढता पाय घेतला असला तरी दिवसभर वातावरण मात्र ढगाळ आणि कोंदट झाले होते.