
चायनीज सेंटरवर खुलेआम मद्यपान
घणसोली, ता. २ (बातमीदार)ः विभागात बेकायदा चायनीज सेंटरवर खुलेआम मद्यपान केले जात आहे. या प्रकाराने स्थानिकांसह महिलावर्गात भीतीचे वातावरण असून परवानगी नसतानाही मद्यपान करणाऱ्या अशा गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागी चायनीज सेंटर उभारण्यात आले आहेत. रात्रभर सुरू असणाऱ्या या गाड्यांवर खुलेआम मद्यपान केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत मद्यपींच्या पार्ट्या येथे सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा मद्यपान केल्यानंतर अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. त्यामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने अशा बेकायदा चायनीज सेंटरवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
-------------------------------------------------------
घणसोली विभागात चायनीज सेंटरवर दारू उपलब्ध करून दिली जात नाही; तरीदेखील असे प्रकार होत असल्यास कोपरखैरणे पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती नागरिकांनी कळवावी. नक्कीच कारवाई केली जाईल.
- अजय भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे
-----------------------------------------
घणसोली भागात अनेक ठिकाणी चायनीज सेंटरवर मद्यपान केले जाते. या ठिकाणी अनेकदा वादावादीचे प्रसंग होतात. त्यामुळे चायनीज सेंटरवर आलेल्या इतर ग्राहकांना त्याचा त्रास होतो.
- मीनल बाविस्कर, ग्राहक