कल्याणमध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद
कल्याणमध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद

कल्याणमध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद

sakal_logo
By

कल्याण, ता. २ (बातमीदार) ः रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे शांतता व संघर्ष निराकरण परिषद शुक्रवारी (ता. ५) संध्याकाळी साडेपाच वाजता के. सी. गांधी सभागृह, बैलबाजार, कल्याण (प) येथे आयोजित करण्यात आलेली आहे. समाजातील वाद कमी होऊन शांतता नांदावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संकल्पनेवर आधारीत ठाणे जिल्ह्यात पहिल्यादांच अशी परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य यांनी दिली. या परिषदेसाठी आतंरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते येणार आहेत. नॉर्वे येथील एरिक सॅालमेन, उच्च न्यायालयाचे न्यायाधीळ श्रीराम मोडक, डीसीपी सचिन गुंजाळ, ब्रिगेडिअर आनंद ठाकूर, शांतता कमिटीचे किशोर देसाई, रोटरी शांतीदूत सागर गांगुर्डे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.