
पडघ्यात पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन
पडघा, ता. २ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा गावासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, सरपंच अमोल बिडवी यांनी तात्कालिन पालकमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवीन पाणीपुरवठा योजना मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार जलजीवन मिशनअंतर्गत १६ कोटी रुपयांच्या जलशुद्धीकरण यंत्रणेसह नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या वेळी आमदार शांताराम मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश भोईर, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) विश्वास थळे, मनसे भिंवडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, पडघा सोसायटीचे सभापती डॉ. संजय पाटील, भाजपयुमो माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रेया गायकर, माजी उपसभापती वृषाली विशे, गुरुनाथ जाधव, सरपंच अमोल बिडवी, उपसरपंच गिरीश जाधव, ग्रामविकास अधिकारी भास्कर घुडे, पोलिस पाटील राजेश सांळुके, कंत्राटदार जी. व्ही. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
(पडघा - येथील पाणीपुरवठा योजनेच्या भुमीपुजन प्रसंगी उपस्थीत मान्यवर.)