बस - कंटेनर अपघातात २३ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस - कंटेनर अपघातात २३ जखमी
बस - कंटेनर अपघातात २३ जखमी

बस - कंटेनर अपघातात २३ जखमी

sakal_logo
By

वाडा, ता. २ (बातमीदार) ः वाडा-भिवंडी महामार्गावर कुडूस येथे मंगळवारी (ता. २) सकाळी पावणेनऊ वाजता कंटेनर व बसचा अपघात झाला. यात २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

पालघर आगाराची पालघर-वडूज ही बस आज सकाळच्या सुमारास पुण्याकडे जात होती. कुडूस येथील कोकाकोला कंपनीसमोर समोर ही बस आली असता समोर चालणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस कंटेनरवर जाऊन आदळली. त्यामुळे बसमधील २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कुणाच्या तोंडाला, कुणाच्या नाकाला, डोक्याला असा किरकोळ मार लागला आहे. काही जखमींवर वाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली. दरम्यान, भिवंडी-वाडा मार्गावर अनेक कारखाने असून या कारखान्यात कच्चा व पक्का माल घेऊन जाणारी वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवली जातात. त्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे.