ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडवे यांचा सन्मान

ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडवे यांचा सन्मान

पालघर, ता. २ (बातमीदार) ः केळवे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडवे यांना ‘आदर्श ग्रामविकास अधिकारी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केळवे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध योजना राबवून केळवे ग्रामपंचायत आयओसी केली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्कार देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडवे यांनी केळवे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात सातत्यपूर्व १०० दिवस गुड मॉर्निंग पथकाद्वारे स्वच्छते महत्त्व आणि ग्रामपंचायत हागणदारीमुक्त केली. नागरी सुविधा जनसामान्यांपर्यंत पोहचवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. चार लघु नळपाणी पुरवठा योजना राबवून वंचित घटकांसाठी पाण्याची सुविधा निर्माण केली. केळवे पर्यटनस्थळ असल्याने केळवे बीच येथे क्लीनिंग मशीन उपलब्ध करून दिली. येथील पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना देण्याकरिता सुरूची बाग आणि समुद्रकिनारी दिवाबत्ती सुविधा उपलब्ध करून दिली. मोडवे यांच्यामुळेच केळवेला विभागीय पातळीवरील पर्यावरणरत्न हा पुरस्कार मिळाला. पर्यटकांसाठी अतिरिक्त प्रसाधन निर्मिती करून दिली. मलनिस्सारणासाठी घंटागाडी, ट्रॅक्टर-ट्रॉलीची व्यवस्था करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com