Thur, Sept 21, 2023

हसन मुश्रीफांना २० जूनपर्यंत दिलासा
हसन मुश्रीफांना २० जूनपर्यंत दिलासा
Published on : 2 May 2023, 6:13 am
मुंबई, ता. २ : हसन मुश्रीफ यांना मनी लॉण्डरिंगप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर २० जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. मनी लॉण्डरिंगप्रकरणी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.