एपीएमसीतील हुक्का पार्लरवर छापा

एपीएमसीतील हुक्का पार्लरवर छापा

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर): एपीएमसीतील सत्रा प्लाझामधील वेजा ॲण्ड पायाना व आँरेंज मिंट या दोन हॉटेलमध्ये छुप्या पद्धतीने बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
एपीएमसीतील सत्रा प्लाझामधील तळ मजल्यावर असलेल्या वेजा ॲण्ड पायना या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीएमसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे सव्वा एकच्या सुमारास सत्रा प्लाझा इमारतीत तळमजल्यावरील शॉप क्रमांक २४ मधील हॉटेल वेजा ॲण्ड पायाना हॉटेलवर छापा टाकला होता. यावेळी काही ग्राहक हुक्का ओढत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी या हॉटेलमधील मॅनेजर आणि दोन वेटर असे तिघांना ताब्यात घेतले आहे; तर दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत सत्रा प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील शॉप क्रमांक २८ मधील हॉटेल आँरेंज मिंटमधील हुक्का पार्लर सव्वा बाराच्या सुमारास छापा मारून पोलिसांनी हॉटेलचा मॅनेजर व दोन वेटर, तसेच ४ ग्राहक अशा एकूण ६ जणांना ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com