Tue, Sept 26, 2023

बोनसरीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
बोनसरीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
Published on : 3 May 2023, 10:03 am
तुर्भे (बातमीदार) : एमआयडीसी येथे सर्पदंशाने एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मानव गावडे (११) असे मृत मुलाचे नाव असून सोमवारी (ता.१) दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली होती.
तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावातील डी. आर. पाटील चाळीच्या परिसरात दुपारच्या वेळेस खेळत असताना दोन रुपयाचे नाणे बिळातून काढताना मानवला सर्पदंश झाला होता; परंतु खेळण्याच्या नादात त्याने कोणाला याबाबत सांगितले नाही. सायंकाळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. यावेळी त्याला वाशीतील मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.