महापालिकेकडून बेघरांची आरोग्य तपासणी

महापालिकेकडून बेघरांची आरोग्य तपासणी

विरार (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गत वसई पूर्वेतील वालीव येथील बेघर निवारा केंद्रात सोमवारी (ता. १) सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २४ महिला आणि २८ पुरुष अशा एकूण ५२ जणांची रक्तदाब, मधुमेह तपासणी, रक्तगट तपासणी, एचआयव्ही व अन्य सर्व प्रकारची रक्ततपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले. डॉ. अस्मिता दरवेशी, सातिवली नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दूधमल आणि नर्सिंग स्टाफ यांच्या देखरेखीत ही तपासणी करण्यात आली. वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, उपायुक्त डॉ. किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुकदेव दरवेशी यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com