Sun, October 1, 2023

अपघातातील रिक्षा पेटल्याने महिला ठार
अपघातातील रिक्षा पेटल्याने महिला ठार
Published on : 3 May 2023, 12:59 pm
ठाणे, ता. ३ (वार्ताहर) ः दुभाजकावर आदळून पेट घेतलेल्या रिक्षात अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गायमुख पोलिस चौकीजवळ बुधवारी (ता. ३) पहाटे पावणे सहाच्या सुमारास घडली.
राजेश यादव हा रिक्षाचालक एका महिला प्रवाशाला घेऊन घोडबंदरकडे निघाला होता. गायमुख पोलिस चौकीजवळ आले असता चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा दुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे रिक्षाने पेट घेतला. प्रवासी महिला रिक्षातच अडकून पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला; तर चालकास गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.