घोडबंदरचा प्रवास लवकरच खड्डेमुक्त

घोडबंदरचा प्रवास लवकरच खड्डेमुक्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : पावसाळा म्हटला की समोर येतात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि झालेली चाळण. यांमुळे रस्त्यांचा वेग मंदावून वाहतूक कोंडीत भर पडत असते. ही बाब लक्षात घेवून ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग सरसावला आहे. ठाणे शहरांतर्गत घोडबंदर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वाघबीळ उड्डाण पुलासह कासारवडवली आदी भागात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दागडुजीची कामे येत्या आठवड्याभरात हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे पावसाळ्यात खड्डे मुक्त व कोंडी मुक्त प्रवास वाहन चालकांना अनुभवायला मिळणार असल्याचा विश्वास बांधकाम विभागाने वर्तविला आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकरांसह वाहनचालकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेवून, ठाणे महापालिका हद्दीतील खड्डे मुक्त रस्त्यांची कामे दोन टप्यात हाती घेण्यात आली आहेत. यासाठी ६०५ कोटी खर्च करुन रस्त्यांची कामे सुरु आहेत. मागील दोन ते तीन महिन्यापासून शहरात ही कामे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अंतर्गत शहरात विकासाची कामे सुरु आहेत.
ठाणे महापालिकेसह आता ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील खड्डे मुक्त रस्त्यांसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार ठाणे शहरांतर्गत घोडबंदर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वाघबीळ उड्डाण पुलावर मास्टिक करण्यात येणार आहे. तर, नागला बंदर, ओवळा आणि वाघबीळ जंक्शन परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करताना काँक्रीटीकरण करण्याबरोबरच मास्टिक पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात खड्डे आणि कोंडी मुक्त प्रवास वाहन चालकांना अनुभवायला मिळणार असल्याचा विश्वास बांधकाम विभागाने वर्तविला आहे.
......................................
बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त पाहणी
ठाणे शहरांतर्गत घोडबंदर मार्गावरील वाघबीळ उड्डाण पुलासह कासारवडवली आदी भागात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असतो. याची दाखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरांतर्गत घोडबंदर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभाग १ चे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. त्यानुसार येत्या आठवड्याभरात या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com