Sun, Sept 24, 2023

मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ
मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ
Published on : 3 May 2023, 2:17 am
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ मध्ये ७.४२ दशलक्ष टन मालवाहतुकीतून ७७१.५० कोटीचा महसूल नोंदवला आहे. गतवर्षी याच महिन्यात ७.१४ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली असून तुलनेत यंदा ३.९१ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जात आहे. चालू वर्षात एप्रिल महिन्यात सिमेंट आणि क्लिंकरचे २४३ रेक, ऑटोमोबाईल्सचे ९५ रेक, कंटेनर लोडिंगमध्ये ७२२ रेक, पेट्रोलियम उत्पादनांचे २०१ रेक, खताचे ९० रेक, लोह आणि स्टीलचे १५९ रेक, लोहखनिजाचे ७३ रेक एवढी मालवाहतूक केली आहे.