जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. तरुलता धानके यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. तरुलता धानके यांचा गौरव
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. तरुलता धानके यांचा गौरव

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. तरुलता धानके यांचा गौरव

sakal_logo
By

किन्हवली, ता. ४ (बातमीदार) : आपल्या खास शैलीतून, सुमधुर आवाजातून राज्य व जिल्हा स्तरावरील विविध कार्यक्रमांमधून निवेदिकेच्या भूमिकेत गेली पंचवीस वर्ष आगळीवेगळी छाप उमटवत आलेल्या डॉ. तरुलता सुनील धानके यांना महाराष्ट्र व जिल्हा प्रशासनाकडून प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, पोलिस आयुक्त जयजीत सिंह, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. धानके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. तरुलता धानके या जिल्हा परिषदेच्या शहापूर आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना धानके यांनी शासकीय कार्यक्रमांमधून निवेदनाची सुरुवात केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाव सरगम कार्यक्रम, कविवर्य वसंत सावंत यांच्या काव्य मैफिली, महामहिम राज्यपालांचे कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. धानके यांनी निवेदन सादर केले आहे. निवेदनात हातखंडा असल्याने अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडूनही डॉ. तरुलता धानके यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.