
मुरबाडमध्ये गुणगौरव सोहळा उत्साहात
मुरबाड, ता. ४ (बातमीदार) : संघर्ष पत्रकार संघ मुरबाड तालुक्याच्या वतीने गुणवंत व्यक्तींचा गुणगौरव सोहळा एमआयडीसी हॉल मुरबाड येथे नुकताच पार पडला. यावेळी मुरबाड तालुक्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या २५ व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. अपंग बांधवांना साहित्य वाटप व वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे, शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावले, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत, मनसेचे नेते शैलेश बिडवी, शिवसेनेचे नेते रामभाऊ दळवी, मुरबाडचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, बदलापूरचे नगरसेवक शैलेश वडणेरे, सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के, उद्योजक नरेश खेतवाणी, सीटू संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलीप कराळे, सामाजिक कार्यकर्ते लियाकत शेख, माजी पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी, संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा सचिव अंकुश सातपुते आणि संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेश म्हाडसे उपस्थित होते.