महारेराकडून वसुलीसाठी मिळकतींचा लिलाव जाहीर

महारेराकडून वसुलीसाठी मिळकतींचा लिलाव जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः वसुलीसाठी नोटीस पाठवूनही संबंधित तक्रारदाराला मुदतीत पैसे न दिल्याने पुण्यातील एका खासगी मिळकतीचा लिलाव करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. शिवाजीनगर येथील एका मिळकतीचा लिलाव १० मे रोजी होणार असून त्यातून ४९ लाख रुपये इतकी नुकसानभरपाई देण्याचे नियोजन महारेराने केले आहे. यातील कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याचे महारेराच्या वतीने कळवण्यात आले आहे.
या मिळकतीचा लिलाव थांबवण्यासाठी विकसकाला शुक्रवारपर्यंतची (ता. ५) मुदत दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई केली जाणार आहे. विकसकाने वेळेत घराचा ताबा न देणे, प्रकल्प थांबवणे, करारानुसार प्रकल्पाची गुणवत्ता न राखणाऱ्यांबाबत महरेराकडे तक्रारी येतात. त्यावर सुनावणी घेऊन महारेराच्या वतीने कारवाई केली जाते. त्यातून पुण्याच्या शिवाजीनगर भांबुर्डा येथील मिळकतीचा लिलाव होणार आहे. हा लिलाव शुक्रवार पेठेतील तहसीलदार कार्यालयात १० मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मेसर्स मॉड्युलर कन्स्ट्रक्शनला विलंबासाठी ग्राहकाला ४९ लाख ८ हजार ३७६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश महारेराने दिले होते; मात्र तक्रारदाराला मुदतीत पैसे न दिल्याने महारेराने याबाबतची नोटीस वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली होते. पुणे शहर तहसीलदारांनी याबाबत उचित कारवाई करून या विकसकाची विष्णू प्रसाद अपार्टमेंटमधील ८३.२८ चौरस मीटर क्षेत्र मिळकत जप्त करून लिलाव जाहीर केला आहे. लिलावासाठी प्रस्तावित मिळकतीचे खरेदी विक्री तक्त्यानुसार मूल्य १ कोटी ६३ लाख ४५ हजार ४१ रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com