मध्य रेल्वेवर मध्यरात्री पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेवर मध्यरात्री पॉवर ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी महत्त्वाचा गर्डर टाकण्याचे काम कोपर स्थानकात सुरू आहे. याकरिता शनिवार- रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण/कसारा विभागात पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत अनेक बदल केले आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाच्या दुसऱ्या ओपन वेब गर्डरचे लाँचिंगसाठी शनिवारी - रविवारी मध्यरात्री कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या व जलद आणि सहाव्या आणि पाचव्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. याचदरम्यान दिवा- ठाणे विभागातील दिवा रोड ओव्हरब्रिजचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. आंबिवली-खडवली दरम्यान टिटवाळा येथे रोड ओव्हरब्रिजसाठी गर्डरचे लाँचिंग मध्यरात्री १ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉकला असणार आहे.
...
वाहतुकीत बदल
शनिवारी रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी सीएसएमटीवरून कर्जतच्या दिशेने जाणारी शेवटची अंबरनाथ लोकल सुटणार आहे. तसेच कसाराकडे जाणारी शेवटची टिटवाळी लोकल सीएसएमटीवरून १० वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ब्लॉकनंतर रविवारी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी कर्जतहून; तर टिटवाळ्याहून पहाटे ५.११ वाजता पहिली लोकल सीएसएमटीसाठी सुटणार आहे.
...
या लोकल रद्द
शनिवारी अंबरनाथ येथून रात्री ९.३५ वाजताची सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल रद्द असणार आहे. रविवारी सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.०४, पहाटे ५.१६ आणि सकाळी ६.१९ वाजता अंबरनाथसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द असणार आहे. कर्जत येथून रविवारी मध्यरात्री १२.२४ वाजता सीएसएमटी सुटणारी लोकल रद्द असणार आहे. अंबरनाथ येथून मध्य रात्री ३.४४ ची, मध्यरात्री ४.०८ वाजताची सीएसएमटी लोकल रद्द असणार आहे. कर्जत येथून मध्य रात्री २.३३ आणि ३.४० ची सीएसएमटी लोकल रद्द असणार आहे.
...
मेल-एक्स्प्रेस गाड्या फटका
शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस,आदिलाबाद- सीएसएमटी एक्स्प्रेस, शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अमरावती- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोंदिया- सीएसएमटी एक्स्प्रेस, सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, मंगला-लशद्वीप एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि पंजाब मेल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने पोहोचतील.
...
या गाड्या वळवणार
भुवनेश्वर-सीएसएमटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस, गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस, चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि तिरुनेलवेली- दादर एक्स्प्रेसला कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. सीएसएमटी - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पुढील डान गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com