अंधेरीतील क्रीडा संकुलाच्या चौकशीसाठी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीतील क्रीडा संकुलाच्या चौकशीसाठी समिती
अंधेरीतील क्रीडा संकुलाच्या चौकशीसाठी समिती

अंधेरीतील क्रीडा संकुलाच्या चौकशीसाठी समिती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलातील (अंधेरी स्पोर्ट्स क्लब) गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून पालिका आयुक्त येत्या ९ मे रोजी संकुलाची पाहणी करणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्या या वर्चस्वाला भाजपने आव्हान दिले आहे. सामान्य घरातील मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यातील खेळाडू घडवावेत, यासाठी मुंबई महापालिकेने १९८८ मध्ये अंधेरीत शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स क्लब) सुरू केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी हे क्रीडा संकुल सर्व सुविधांसह सज्ज आहे; मात्र हे क्रीडा संकुल खेळांच्या प्रशिक्षणासाठी न वापरता त्याचा वापर लग्नसमारंभ, इव्हेंट्स व शूटिंगसाठी होत असल्याचा आरोप भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केला. या संकुलाचा कारभार चालवण्यासाठी दिलेले कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या १४ एकर जागेवर असलेल्या या क्रीडा संकुलाचे खासगीकरण करून गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती.
...
गैरव्यवहाराचे आरोप
क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी इतर मैदानी खेळ येथे खेळले जात होते. आता फक्त फुटबॉल खेळला जातो. मोठे लग्नसमारंभ आणि एका राजकीय पक्षाचा कारभार चालतो. डेकोरेटरचा विळखा पडला आहे. खेळाडूंकरिता निवासासाठी ५६ रूमचे वसतिगृह बनवण्यात आले होते. आता त्याचे थ्री स्टार हॉटेल बनवले असून त्या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग व्यवस्था करण्यात आली आहे, असे आरोप आमदार लव्हेकर यांनी केले आहेत.