सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : कळवा प्रभाग समितीअंतर्गत जय भारत मैदानाशेजारील अनधिकृत इमारत प्रकरण असो, खाडीकिनारी कांदळवन नष्ट करून अनधिकृत बांधकाम प्रकरण, प्रभाग समितीअंतर्गत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरून पालिका आयुक्त आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आले आहे.
कळवा प्रभाग समिती क्षेत्रात असलेल्या जय भारत मैदानाशेजारी आठ मजली अनधिकृत इमारत अवघ्या चार महिन्यांत उभी राहिली आहे. या इमारतीबाबत तक्रारी येऊनदेखील कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. अशा अनेक अनधिकृत इमारती कळव्यात उभ्या राहिल्या असून प्रशासनाच्या डोळ्यादेखत या इमारती पूर्ण होईपर्यंत सहायक आयुक्तांकडून अशा इमारतींकडे दुर्लक्ष केले जाते. या संपूर्ण प्रकरणी ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दाखल घेतली असून अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याकडून तीन दिवसांत खुलासा मागवला आहे.

..............................
कारवाईसाठी कोणता मुहूर्त काढणार?
पुरावे देऊनही ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामाच्या इमारतीना संरक्षण देणारे सहायक आयुक्त सचिन बोरसे, समीर जाधव आणि सुबोध ठाणेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार कधी, असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केला आहे. तसेच त्या कारवाईसाठी कोणता मुहूर्त काढणार, असे म्हटले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास आपणास जबाबदार धरून न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी ई-मेलद्वारे केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com