महिलेची सात लाखांना फसवणूक

महिलेची सात लाखांना फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : ‘व्हिडीओ लाईक करा आणि कमवा’ असे प्रलोभन दाखवून मालाडमधील २९ वर्षीय महिलेची सात लाख १६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला वास्तुविशारद असून गर्भवती असल्यामुळे तिने काही दिवसांपूर्वी नोकरी सोडली होती. त्यामुळे ती पार्ट टाईम जॉबच्या शोधात होती. यातच २ मे रोजी एका अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप संदेश आला. ‘ऑनलाईन काम करण्यात उत्सुक आहात का? फक्त काही यू-ट्युब व्हिडीओ लाईक करावे लागतील आणि त्यासाठी पैसे मिळतील’, असे संदेशात नमूद होते. तक्रारदार महिलेने नोकरीसाठी उत्सुकता दाखवल्यानंतर तिला एक चित्रफीत लाईक करण्यास सांगण्यात आले. त्या बदल्यात तिला ५० रुपये मिळाले. नंतर तिने आणखी कामे पूर्ण केली आणि पैसेही मिळाले. त्यानंतर मात्र तिला पुढचे पैसे मिळण्यासाठी काही रक्कम गुंतवावी लागेल असे सांगण्यात आले. अशा तऱ्हेने तक्रारदार महिलेने टप्प्याटप्‍प्याने सात लाख १६ हजार रुपये जमा केले. त्यानंतरही रक्कम न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारीनुसार कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com