मुंबई - पुणे - रत्नागिरी १६ विशेष रेल्वेगाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई - पुणे - रत्नागिरी १६ विशेष रेल्वेगाड्या
मुंबई - पुणे - रत्नागिरी १६ विशेष रेल्वेगाड्या

मुंबई - पुणे - रत्नागिरी १६ विशेष रेल्वेगाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई -पुणे आणि रत्नागिरीदरम्यान १६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. याआधीच ९४२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या वर्षी एकूण उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या ९५८ वर पोहोचली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक अनारक्षित विशेष (आठ फेऱ्या) ५ ते २६ मेपर्यंत धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११३४ साप्ताहिक अनारक्षित विशेष दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पनवेलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११३३ साप्ताहिक अनारक्षित विशेष रत्नागिरी गाडी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११३१ पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दर गुरुवारी रात्री ८.५० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११३२ साप्ताहिक अनारक्षित स्पेशल रत्नागिरीहून दर शनिवारी रत्नागिरी स्थानकावरून दुपारी १ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता पुण्याला पोहोचेल. या दोन्ही गाड्या लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत.