टोकावडे परिसरात डेंग्यू, टायफाईडची साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोकावडे परिसरात डेंग्यू, टायफाईडची साथ
टोकावडे परिसरात डेंग्यू, टायफाईडची साथ

टोकावडे परिसरात डेंग्यू, टायफाईडची साथ

sakal_logo
By

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : टोकावडे परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी, टायफॉईड तापाची साथ सुरू आहे. तळवली बारागाव ग्रामपंचातीमधील उंबरपाडा येथे डेंगी तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. याची माहिती मिळताच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इगळे यांना तात्काळ उंबरपाडा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले. तसेच ठाणे जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी पवार यांनी संपर्क करून औषध फवारणी, जनजागृती करण्याबाबत सूचना केल्या. तनुजा गोल्हे, तन्मय गोल्हे, सपना गोल्हे, जान्हवी बांगर, मंदाबाई देशमुख, महेश पवार, लक्ष्मण वेखंडे, विठ्ठल पवार, मोनिका शेलवले, ताराबाई वेखंडे, लक्ष्मीबाई पवार यांना डेंगी व तापाची लागण झाल्याचे समजते. या वेळी मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पवार, संजय पवार, अजय चौधरी, जयराम पगार, शिवसेना विभागप्रमुख संतोष मोरे, शाखाप्रमुख तानाजी गोल्हे आदींनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.