लाचप्रकरणी खासगी एजंट ताब्यात

लाचप्रकरणी खासगी एजंट ताब्यात

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : वाहनपरवाना परत देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील दोघा खासगी एजंटना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. सुहास जाधव (वय ३४) आणि शरद कांबळे (वय ४५) अशी या खासगी एजंटची नावे आहेत.
एपीएमसी मार्केटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेला जयराम तिथे (३४) यांची स्वत:ची रिक्षा आहे. कामावरून सुटल्यानंतर ते रिक्षा चालवतात. गेल्या बुधवारी (ता. ३) सकाळी ८ वाजता रिक्षामध्ये भाजीपाल्यासह एक प्रवासी घेऊन ते जात होते. याचवेळी कांदा-बटाटा मार्केटसमोर नवी मुंबई आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तिथे याची रिक्षा अडवून प्रवासी रिक्षातून माल वाहतूक केल्याप्रकरणी १० हजार रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावला होता. तसेच वाहन परवाना ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालयात दंडाची रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी तिथे यांनी आरटीओ कार्यालयात १० हजारांच्या दंडाची रक्कम ऑनलाईन भरली होती. तसेच खिडकी क्रमांक २८ वरील कर्मचाऱ्याकडे वाहन परवाना, तसेच दंड भरलेल्या पावतीची मागणी केली होती. त्याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुहास जाधव आणि शरद कांबळे यांनी तिथे त्यांच्याकडे दोन हजारांची मागणी केली होती. त्यामुळे तिथे त्यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com