नवी मुंबईत धावणार मेट्रोची निओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत धावणार मेट्रोची निओ
नवी मुंबईत धावणार मेट्रोची निओ

नवी मुंबईत धावणार मेट्रोची निओ

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : नवी मुंबईत बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो- १ चे काम पूर्णत्वास आले आहे. या सुविधेचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे; परंतु मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर, तसेच आरामदायी होण्यासाठी सिडकोने स्टँडर्ड गेज मेट्रोच्या जागी मेट्रो-निओ ही नवी प्रणाली धावणार आहे.
मेट्रानिओ ही ओव्हरहेड ट्रक्शन सिस्टीमद्वारे चालवलेली रबर टायर बाय-आर्टिक्युलिटेड इलेक्ट्रिक ट्रॉली-बस आहे. ही एक नावीन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था असून २० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी विकसित केलेली वाहतूक सेवा आहे. या बसमध्ये अतिशय सुलभ, जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम (एमआरटीएस ) असून मेट्रो निओ प्रवाशांना मेट्रोसारखीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रवासाची अनुभूती नवी मुंबईकरांना होणार आहे.
-----------------------------------------------------------
पर्यावरणपूरक प्रणाली
- मेट्रो-निओचे डबे पारंपरिक मेट्रो ट्रेनपेक्षा लहान आणि वजनाने हलके असणार आहेत. मेट्रो-निओ ही एक अत्याधुनिक, आरामदायी, ऊर्जा कार्यक्षम, कमीत कमी ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणपूरक प्रणाली असून रबर टायर्सवर चालणारी पहिली एमआरटीएस प्रणाली असणार आहे.
- ओव्हरहेड इलेक्ट्रिक ट्रक्शनने चालणारी ही एक बाय-आर्टिक्युलेटेड ट्रॉली बस प्रणाली असून ती वातानुकूलित, ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टीम, लेव्हल बोर्डिंग, आरामदायी आसन सुविधा, प्रवाशांसाठी घोषणा, इलेक्ट्रॉनिक डिस्फ्लेवरील माहिती सुविधांनी युक्त असणार आहे.
-----------------------------------------
भारतातील एक नावीन्यपूर्ण प्रकल्प ठरणारा नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा मेट्रो-निओ एमआरटीएसचा एक भाग म्हणून विकसित केला जात आहे. या सुविधेमुळे नवी मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको