Tue, Sept 26, 2023

कुडूस नळ पाणी योजनेचे लोकार्पण
कुडूस नळ पाणी योजनेचे लोकार्पण
Published on : 6 May 2023, 9:42 am
वाडा (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणाने रखडलेली पाणी योजना आता सुरू करण्यात आली. कुडूसचे सरपंच राजेंद्र कोंगील यांच्या हस्ते पाणी योजनेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, ग्रामविकास अधिकारी रोहिणी चौधरी, जव्हार अर्बन बँक संचालक व विद्यमान सदस्य मुदस्सर पटेल, सामाजिक कार्यकर्ते अल्लारख मेमन, मोसिन पटेल, चंद्रकांत चौधरी, प्रकाश शेटे रिदवान पटेल, अनंता चौधरी, जयश्री चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अंजनी चौधरी, कादंबरी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. दहा वर्षांपासून रखडलेली पाणी योजनेच्या उद्घाटनाने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.