Fri, Sept 22, 2023

विक्रमगडमध्ये आपला दवाखाना केंद्राचे उद्घाटन
विक्रमगडमध्ये आपला दवाखाना केंद्राचे उद्घाटन
Published on : 6 May 2023, 9:43 am
विक्रमगड (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचे अनावरण सोहळा पार पडला. दिवेकर वाडी येथे आपला दवाखाना केंद्राचे प्रत्यक्षपणे उद्घाटन विक्रमगड पंचायत समिती सभापती यशवंत कनोजा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपसभापती विनोद भोईर, विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती विक्रमगड डॉ. निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. आपला दवाखाना या उपक्रमांतर्गत १४७ वैद्यकीय चाचणी व उपचार रुग्णांना विनामूल्य करून मिळणार आहेत; तरी या दवाखान्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.