आता सर्व्हिस रोडवर पार्किंगसाठी जागा

आता सर्व्हिस रोडवर पार्किंगसाठी जागा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विविध रस्त्यांची व उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. त्यात सकाळ व संध्याकाळी शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या वेळेत सर्व्हिस रोड हा पर्यायी रस्ता म्हणून वापरला जात आहे. अशातच येत्या चार ते पाच दिवसांत पुन्हा पालिकेकडून सर्व्हिस रोडवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा केला आहे.
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विविध मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू असल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होत आहे. या गर्दीचा फटका अत्यावश्यक सेवेतील वाहनांना बसू नये, यासाठी सर्विस रोड तयार करण्यात येत असतात. मात्र, ठाण्यातील तीनहात नाका ते माजिवडा या सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदा आणि नो पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहने उभी करण्यात येत होती. यावर पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई करीत हा सर्व्हिस रोड पार्किंग मुक्त करण्यात आला होता. असे असताना, आता तीन हातनाका ते माजिवडा जंक्शन उजव्या बाजूकडील सर्व्हिस रोडवर समांतर पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महामार्ग सोडून इमारतीखालील रस्त्याच्या बाजूला ही पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यासाठीचे बोर्ड तयार केले जात असून ते बोर्ड लावण्यात आल्यानंतर ही सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यानुसार रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग झाल्याने दुसरी बाजू मोकळी होणार आहे. त्यामुळे याचा निश्चितच फायदा ठाणेकरांना होणार असल्याचा दावा पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केला आहे.

....
एका बाजूला समांतर पार्किंग
ठाणे शहरातील पार्किंगची समस्या मोठी आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी काही बदल केल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार वागळे इस्टेट येथील रोड नंबर १६, २२, नेपच्युन, पासपोर्ट कार्यालय आणि इंदिरा नगर ते नितीन कंपनी आदी रस्त्यांवर महापालिकेने समांतर पार्किंगचा प्रयोग राबिवला होता. त्याला यश आल्याने येथील वाहतूक कोंडीचीही समस्या मार्गी लागली आहे. या भागातील रस्त्याच्या एका बाजूला समांतर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com