Sat, Sept 23, 2023

कल्याणमध्ये ‘धम्म पहाट’ कँडल मार्च
कल्याणमध्ये ‘धम्म पहाट’ कँडल मार्च
Published on : 6 May 2023, 9:56 am
कल्याण, ता. ६ (बातमीदार) : बुद्ध जयंतीनिमित्त पहाटेच्या मंगलमय वातावरणात बौद्ध उपासक उपासिका यांच्या सहभागाने कल्याण पूर्वेत ‘धम्म पहाट कँडल मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. या कँडल मार्चमध्ये मान्यवर बौद्ध समाजबांधव तसेच असंख्य उपासक - उपासिकांनी परिवारासह शुभ्र वस्त्र परिधान करून सहभाग घेऊन भगवान गौतम बुद्धांना मानवंदना दिली. म्हसोबा चौकातील जागृती मंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृहासमोरून या मार्चला प्रारंभ करण्यात आला. तिसगांव नाका, पुना लिंक मार्गे विजयनगर नाक्याहून छत्रपती शिवाजी कॉलनी मार्गे जुनी जनता सहकारी बँक, मुख्य बाजार पेठेतून पुढे जाऊन सिद्धार्थनगर येथील बुद्ध विहारात पोहचल्यानंतर या ठिकाणी बुद्ध वंदना - त्रिसण - पंचशीलेचे पठण झाल्यानंतर खिरदानाने या कँडल मार्चची सांगता करण्यात आली.